माझा मराठीचा बोलू कौतुके,अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन !!! संत ज्ञानेश्वर
सोमवार, जून २९, २०२०
ब्रह्म कमळ /Bethelham Lily/Epiphyllum oxypetalum
शनिवार, जून २७, २०२०
वेडा राघू / Green Bee Eater
विजेच्या तारांवर हा आपल्याला दिसतो. तो जोडीनेच राहतो. एक दिसला की समजावे दूसरा कुठतरी असलाच पाहिजे. वेडा राघू या पक्ष्याला बहिरा पोपट असेही म्हणतात. शेपटी निमुळती लांब असते. हवेत उडणारे कीटक, मधमाश्या पकडून खातो. याचा रंग हिरवा असला तरी पोपटाइतका हिरवा नसतो.
बुधवार, मार्च १५, २०१७
गुरुवार, मे २६, २०१६
इंग्रजी माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा
इंग्रजी माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा
एक वस्तुस्थिती
1)जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांना काय देतात? मोफत शिक्षण, (सर्वांना ) मोफत पाठ्यपुस्तके, (सर्वांना ) मोफत दोन गणवेश, (सर्वांना ) मोफत सायकली, (मुलींना ) आदिवासी मुलांना व सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती , मोफत स्काॅलरशिप परीक्षा, (सर्वांसाठी )
मोफत प्रज्ञा शोध परीक्षा, (सर्वांसाठी)
इयत्ता पहिली पासून इंग्रजी विषयाचे अध्यापन ,
वाचन, लेखन, संभाषणसाठी We Learn English हा Radio Program,
सर्व महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येत असून त्याद्वारे राष्ट्र प्रेम निर्माण केले जाते.
दरवर्षी प्रजासत्ताकदिनी गॅदरींग सारख्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाते.
प्रत्येक घरी शौचालय असावे म्हणून धडपडत असते जिल्हा परिषद शाळा !!!
प्रत्येकास कुटुंब नियोजन कळावे म्हणून धडपडत आली आजपर्यंत जिल्हा परिषद शाळा !!!
गाव, परिसर स्वच्छ राहावा , आरोग्यदायी रहावा म्हणून आजपर्यंत धडपडत असणारी शाळा जिल्हा परिषदचीच !!!
म्हणून म्हणतो मातृभाषा हेच मानसशास्रीय आणि नैसर्गिक माध्यम आहे .
आपल्या कोवळ्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमाच्या कोंडवाड्यात टाकून त्यांच्या नैसर्गिक वाढ आणि विकासाची दुर्दशा करू नका !!!
आज जिल्हा परिषद शाळेत संगणक लॅब , E.
Learning ,टॅबलेट आहेत .
शाळांचे वातावरणात चित्रमय आहे, बोलके आहे,
प्रशिक्षित आणि गुणवंत शिक्षकवर्ग आहे.
आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना जे येते
त्यापेक्षा जास्तच ह्या मुलांना येते. आणि हे सगळे करण्यासाठी पैशांच्या थैल्या या शाळेत खाली करून घेतल्या जात नाहीत .......
इंग्रजीत संभाषण, वाचन, लेखन यात ही मुले कुठेच कमी पडत नाहीत हे आम्ही छाती ठोकून सांगतो. ......
आणि शेवटी इंग्लिश मिडियमला जाऊनही
कचरा किंवा गाळ होणारी तुमची लेकरं आमच्याच वळचणीला येणार . काय ?
इंग्रजीतून सांगतो Be Alert , don't be fool all over in your life?
शुक्रवार, जुलै १७, २०१५
वारी
वारी चालली पंढरी
विठ्ठल विठ्ठल गजर,
वारकरी चाले पायी
माझं कोरडं वावर .
टाळ आणि टाळ्या
मुखी भजन विठूचे ,
घरी पोरं आणि गुरं
माझं कोरडं वावर.
एक डोळा आभाळी ,
एक डोळा अश्रू ढाळे ,
ऋण कसे फेडणार
माझं कोरडं वावर.
दुष्काळ दयेचा पडला
मळा मायेचा आटला,
चंद्रभागे वाळवंट
माझं कोरड वावर
ज्ञानेश्वर तुकाराम
तुम्ही वैकुंठाला गेला ,
आम्ही पंढरीला जातो
मागे कोरडं वावर.
आषाढ आला पाऊस गेला
विठ्ठलाला साकडे
भजन गात रोकडे
मागे कोरड वावर
नाही धान्य नाही पैसा
विठ्ठला हा काळ कसा ,
सावकारे गाठलो आता
मागे कोरडं वावर.
रोज जाती जीव
येत नाही का रे कीव ,
विठ्ठला कैसा दगड तू झाला
पाड पाऊस ,माझं कोरडं वावर.
.....श्री. तुकाराम गायकर
रविवार, जून २८, २०१५
मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा
आज वाईट वाटते ते याच गोष्टी बद्दल की मराठी भाषकच मराठी भाषेवर आक्रमण करीत आहे. त्यांना आजपर्यंत मराठीने पोसले, मोठे केले तेच तिचे कट्टर शत्रू होत आहेत.
मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही अशी खोटी बोंब मारली जाते आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेला विद्यार्थी भरती येते. अर्थात या इंग्रजी शाळांचा दर्जा पाहिला तर खूप अवघड परिस्थिती दिसून येते. हे विद्यार्थी इंग्रजी शिकायला जातात आणि पदरात अज्ञान घेऊन येतात . कारण या विद्यार्थ्यांच्या हाती इंग्रजी भाषा लागत नाही आणि मायबोली मराठीचे अमृताची चव त्यांना काय असते ते कळत नाही.
याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची तळमळ आणि चळवळ उभी राहत आहे.जुन्नर तालुक्यातील डिंगोरे शाळेची बातमी वाचली . शिक्षकांनी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या सुमारे एक्केचाळीस विद्यार्थ्यांना पुनश्च जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे वळवून दाखल केले. त्यामध्ये या शाळेचे शिक्षकांना खूप काही कष्ट घ्यावे लागले असणार यात शंकाच नाही. यामध्ये या शाळेतील शिक्षक श्री. संजय डुंबरे गुरुजी यांनी सर्व शिक्षकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले शिवाय स्वतः पुढे होऊन या प्रचंड कार्याचे शिवधनुष्य उचलून दाखवले. हे सर्व शिक्षक आणि शिक्षिका अभिनंदनास पात्रआहेत.
यानंतर अनेक शाळा या अभियानात सहभागी होत आहेत. प्रयत्नशील आहेत. जुन्नर तालुक्यातील राजुरी, आळे, ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून घर वापसीसाठी कष्ट घेत आहेत आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे असे वृत्तांत दैनिकात प्रसिद्ध झाले आहेत.
हे सर्व शिक्षक मराठी भाषेचे हित जोपासत आहेत. त्या सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा! आणि मला वाटते
हा खरा मराठी बाणा आहे. केवळ मराठी हिताची बोंब ठोकायची आणि मतपेढी तयार करण्यात धन्यता मानायची, हा मराठी बाणा नसून मराठी भाषेचा कणा मोडणारी कृती आहे.
Featured Post
मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा
आज आपण एकविसाव्या शतकात इंग्रजी भाषेचे प्रचंड प्रमाणात अनुसरण करीत आहोत. हे आपल्या मराठी भाषाभिमानी माणसाला अ...
-
कणा - कुसुमाग्रज (kana poem by Kusumagra j) कणा ‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंत...
-
CTET Paper 1 विषय: बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र प्रश्नपत्रिका स्वरूप: बहुपर्यायी प्रश्न (MCQ) एकूण प्रश्न: 30 CTET Solved Papers प्रश...
-
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला दरवर्षी 2013 सालापासून मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रभर आणि जिथे जिथे मराठी भाषा...



