वेडा राघू / Green Bee Eater

                                   वेडा राघू हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत याचे वास्तव्य आहे.हिमालयात ५००० किंवा ६००० फूट उंचीवरसुद्धा आढळले आहेत. त्याच्या विशिष्ट  नावामुळे तो लगेच नावात वेडा शब्द असल्याने आपल्याला  वाटेल असे कसे नाव आहे. हा पक्षी त्याच्या वर्तनावरून वेडा नाही तर बुद्धिमान वाटतो. भक्ष्य पकडताना वेडीवाकडी वळणे घेतो. सुरही मारतो. अचूकपणे भक्ष्याचा वेध घेतो. त्याच्या भक्ष्य पकडतांनाच्या वेड्यावाकड्या वळणांमुळे वेडा राघू हे नाव पडले असावे: असे वाटते. भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो. परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला ‘वेडा राघू’ असे नाव पडले आहे.असेही म्हटले जाते.
                 नावापूर्वी वेडा अशी उपाधी भेटलेला हा एकमात्र प्राणी असावा. त्याचे वेडा राघू हे गुणवैशिष्ट्यपूर्ण आहे.राघू या नावामुळे तो पोपट वाटेल: परंतू पोपटसारखा असणारा साधारणतः चिमणीच्या आकाराएवढा हा पक्षी आहे
इंग्लिश नाव : Little Green Bee-eater) शास्त्रीय नाव :Merops orientalis

                 विजेच्या तारांवर हा आपल्याला दिसतो. तो जोडीनेच राहतो. एक दिसला की समजावे दूसरा कुठतरी असलाच पाहिजे. वेडा राघू या पक्ष्याला बहिरा पोपट असेही म्हणतात. शेपटी निमुळती लांब असते. हवेत उडणारे कीटक, मधमाश्या  पकडून खातो. याचा रंग हिरवा असला तरी पोपटाइतका  हिरवा नसतो.
                डोके आणि मानेवर सोनेरी व तपकिरी (brown) रंगाचे मिश्रण असते. चोचीच्या खाली निळसर छटा दिसते.चोच बाकदार व शरीराच्या मानाने लांब असते. तशीच शेपटीसुद्धा .
               फेब्रुवारी ते मे हा विणीचा काळ असतो.जमिनीच्या बांधामध्ये किंवा वाळूच्या कडेला एखाद्या बोगद्यासारखे वेडा राघूचे घरटे असते.त्यामध्ये मादी पांढरी चमकदार अंडी घालते. उबवणीचे काम नर मादी दोघेही करतात. आणि पुढे पिल्लांच्या संगोपणाचे कामसुद्धा मिळून करतात.
                  *** मुख्य माहिती स्रोत :- विकिपीडिया .
                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

कणा - कवी कुसुमाग्रज (kana poem by Kusumagraj)

वारी