मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा
आज आपण एकविसाव्या शतकात इंग्रजी भाषेचे प्रचंड प्रमाणात अनुसरण करीत आहोत. हे आपल्या मराठी भाषाभिमानी माणसाला अजिबात भूषणावह नाही. पण इंग्रजी भाषाच एकमेव ज्ञानभाषा आहे, असा गैरसमज मराठी भाषेचा शत्रू बनत आहे. थोडक्यात काय तर आपण एका भयंकर गैरसमज आणि अफवेने मराठी भाषेला कमी लेखत आहोत. कारण मराठी ही शतकानुशतके एक ज्ञान भाषा म्हणून भारतात नांदत होती आणि आता सुद्धा नांदत आहे.
आज वाईट वाटते ते याच गोष्टी बद्दल की मराठी भाषकच मराठी भाषेवर आक्रमण करीत आहे. त्यांना आजपर्यंत मराठीने पोसले, मोठे केले तेच तिचे कट्टर शत्रू होत आहेत.
मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही अशी खोटी बोंब मारली जाते आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेला विद्यार्थी भरती येते. अर्थात या इंग्रजी शाळांचा दर्जा पाहिला तर खूप अवघड परिस्थिती दिसून येते. हे विद्यार्थी इंग्रजी शिकायला जातात आणि पदरात अज्ञान घेऊन येतात . कारण या विद्यार्थ्यांच्या हाती इंग्रजी भाषा लागत नाही आणि मायबोली मराठीचे अमृताची चव त्यांना काय असते ते कळत नाही.
याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची तळमळ आणि चळवळ उभी राहत आहे.जुन्नर तालुक्यातील डिंगोरे शाळेची बातमी वाचली . शिक्षकांनी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या सुमारे एक्केचाळीस विद्यार्थ्यांना पुनश्च जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे वळवून दाखल केले. त्यामध्ये या शाळेचे शिक्षकांना खूप काही कष्ट घ्यावे लागले असणार यात शंकाच नाही. यामध्ये या शाळेतील शिक्षक श्री. संजय डुंबरे गुरुजी यांनी सर्व शिक्षकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले शिवाय स्वतः पुढे होऊन या प्रचंड कार्याचे शिवधनुष्य उचलून दाखवले. हे सर्व शिक्षक आणि शिक्षिका अभिनंदनास पात्रआहेत.
यानंतर अनेक शाळा या अभियानात सहभागी होत आहेत. प्रयत्नशील आहेत. जुन्नर तालुक्यातील राजुरी, आळे, ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून घर वापसीसाठी कष्ट घेत आहेत आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे असे वृत्तांत दैनिकात प्रसिद्ध झाले आहेत.
हे सर्व शिक्षक मराठी भाषेचे हित जोपासत आहेत. त्या सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा! आणि मला वाटते
हा खरा मराठी बाणा आहे. केवळ मराठी हिताची बोंब ठोकायची आणि मतपेढी तयार करण्यात धन्यता मानायची, हा मराठी बाणा नसून मराठी भाषेचा कणा मोडणारी कृती आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा