पोस्ट्स

वेडा राघू/green bee eater /पक्षी/birds/sahyadri लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वेडा राघू / Green Bee Eater

इमेज
                                   वेडा राघू हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत याचे वास्तव्य आहे.हिमालयात ५००० किंवा ६००० फूट उंचीवरसुद्धा आढळले आहेत. त्याच्या विशिष्ट  नावामुळे तो लगेच नावात वेडा शब्द असल्याने आपल्याला  वाटेल असे कसे नाव आहे. हा पक्षी त्याच्या वर्तनावरून वेडा नाही तर बुद्धिमान वाटतो. भक्ष्य पकडताना वेडीवाकडी वळणे घेतो. सुरही मारतो. अचूकपणे भक्ष्याचा वेध घेतो. त्याच्या भक्ष्य पकडतांनाच्या वेड्यावाकड्या वळणांमुळे वेडा राघू हे नाव पडले असावे: असे वाटते. भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो. परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला ‘वेडा राघू’ असे नाव पडले आहे.असेही म्हटले जाते.                  नावापूर्वी वेडा अशी उपाधी भेटलेला हा एकमात्र प्राणी असावा. त्याचे वेडा राघू हे गुणवै...