गुरुवार, फेब्रुवारी ०५, २०२६

CTET-FEB 2026 Download Admit Card 

 *CTET-FEB 2026


*Download Admit Card*


*➡️ The link will active after 11:00 am *


*➡️ Only for those candidates, whose exam is on 07/02/2026*

CTET-FEB Admit Card Download Link

https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx

CTET PAPER 1 परीक्षेसाठी बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र संभाव्य प्रश्न

CTET Paper 1

विषय: बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 

प्रश्नपत्रिका स्वरूप: बहुपर्यायी प्रश्न (MCQ) 

एकूण प्रश्न: 30 CTET Solved Papers

प्रश्न व उत्तरे


1. बालकाच्या शिकण्याची प्रक्रिया कोणत्या घटकावर सर्वाधिक अवलंबून असते?  

   - (A) शिक्षक  

   - (B) वातावरण ✅  

   - (C) पाठ्यपुस्तक  

   - (D) पालक  


2. "बालक हे केंद्रबिंदू आहे" ही संकल्पना कोणत्या शिक्षणतत्त्वज्ञाने मांडली?  

   - (A) पियाजे  

   - (B) जॉन ड्यूई ✅  

   - (C) स्किनर  

   - (D) ब्रुनर  


3. पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार "Concrete Operational Stage" कोणत्या वयात येते?  

   - (A) 2–7 वर्षे  

   - (B) 7–11 वर्षे ✅  

   - (C) 11–15 वर्षे  

   - (D) 15 वर्षांनंतर  


4. "Reward and Punishment" ही पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे?  

   - (A) स्किनर ✅  

   - (B) पियाजे  

   - (C) वायगोत्स्की  

   - (D) कोहल्बर्ग  


5. "Zone of Proximal Development (ZPD)" ही संकल्पना कोणी मांडली?  

   - (A) पियाजे  

   - (B) वायगोत्स्की ✅  

   - (C) ब्रुनर  

   - (D) स्किनर  


6. बालकाच्या भाषाविकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?  

   - (A) आनुवंशिकता  

   - (B) वातावरण ✅  

   - (C) शाळा  

   - (D) खेळ  


7. "Learning by Doing" ही संकल्पना कोणत्या शिक्षणतत्त्वज्ञाने मांडली?  

   - (A) जॉन ड्यूई ✅  

   - (B) पियाजे  

   - (C) स्किनर  

   - (D) ब्रुनर  


8. बालकाच्या भावनिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते?  

   - (A) खेळ ✅  

   - (B) अभ्यास  

   - (C) परीक्षा  

   - (D) बक्षीस  


9. "Moral Development" या विषयावर संशोधन कोणी केले?  

   - (A) कोहल्बर्ग ✅  

   - (B) पियाजे  

   - (C) स्किनर  

   - (D) ब्रुनर  


10. "Constructivism" या शिक्षणतत्त्वाशी कोणता मानसशास्त्रज्ञ संबंधित आहे?  

   - (A) पियाजे ✅  

   - (B) स्किनर  

   - (C) वायगोत्स्की  

   - (D) थॉर्नडाइक  


---


उर्वरित प्रश्न (11–30) उत्तरांसहित


11. "Trial and Error" पद्धत कोणी मांडली? → थॉर्नडाइक ✅  

12. बालकाच्या शिकण्यामध्ये "Motivation" ची भूमिका काय आहे? → शिकण्यास प्रोत्साहन देते ✅  

13. "Scaffolding" ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? → वायगोत्स्की ✅  

14. "Operant Conditioning" सिद्धांत कोणी मांडला? → स्किनर ✅  

15. बालकाच्या सामाजिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते? → गटक्रियाकलाप/खेळ ✅  

16. "Play-way Method" कोणत्या शिक्षणतत्त्वाशी संबंधित आहे? → बालकेंद्रित शिक्षण ✅  

17. "Intelligence Quotient (IQ)" मोजण्यासाठी कोणता सूत्र वापरला जातो? → (Mental Age ÷ Chronological Age) × 100 ✅  

18. "Child-centered Education" ही संकल्पना कोणत्या शिक्षणतत्त्वज्ञाने मांडली? → जॉन ड्यूई ✅  

19. "Intrinsic Motivation" म्हणजे काय? → आतून येणारी प्रेरणा ✅  

20. "Extrinsic Motivation" म्हणजे काय? → बाह्य घटकांमुळे मिळणारी प्रेरणा ✅  

21. "Bloom’s Taxonomy" मध्ये किती स्तर आहेत? → 6 स्तर ✅  

22. "Learning Styles" मध्ये कोणते प्रकार येतात? → Visual, Auditory, Kinesthetic ✅  

23. "Inclusive Education" म्हणजे काय? → सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारे शिक्षण ✅  

24. "Formative Assessment" कशासाठी वापरली जाते? → शिकण्याची प्रगती तपासण्यासाठी ✅  

25. "Summative Assessment" कशासाठी वापरली जाते? → अंतिम निकाल/मूल्यमापनासाठी ✅  

26. "Metacognition" म्हणजे काय? → स्वतःच्या विचारप्रक्रियेची जाणीव ✅  

27. "Self-learning" साठी कोणते साधन उपयुक्त आहे? → ई-लर्निंग/पुस्तके ✅  

28. "Collaborative Learning" म्हणजे काय? → गटाने शिकणे ✅  

29. "Experiential Learning" कोणत्या तत्त्वज्ञाशी संबंधित आहे? → डेव्हिड कोलब ✅  

30. बालकाच्या शिकण्यामध्ये "Feedback" ची भूमिका काय आहे? → शिकण्याची सुधारणा व दिशा देणे ✅  


-

ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तक समरी (Marathi) | लहान सवयींनी आयुष्य बदला Atomic Habits Book Summary in Marathi – Motivation & Life Change

 ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तक  (Marathi) | लहान सवयींनी आयुष्य बदला

Atomic Habits Book in Marathi – Motivation & Life Change

आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळे यश, शिस्त आणि आनंद शोधत असतो.

पण अनेक वेळा अपयश येतं, कारण आपण मोठ्या बदलांचा विचार करतो, लहान सवयींकडे दुर्लक्ष करतो.

“ॲटॉमिक हॅबिट्स” Atomic Habits – James Clear याच ठिकाणी आपली विचारसरणी बदलतं.

हे पुस्तक सांगतं की लहान सवयींमध्येच मोठ्या यशाची बीजं दडलेली असतात.

Atomic Habits  म्हणजे काय?

“ॲटॉमिक” म्हणजे अतिशय लहान पण शक्तिशाली.

दररोज फक्त १% सुधारणा केली, तर वर्षभरात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं.

❝ आपण ध्येयांपर्यंत पोहोचत नाही,

आपण आपल्या सिस्टीमच्या पातळीपर्यंत खाली येतो ❞

— James Clear

ॲटॉमिक हॅबिट्स मराठी आवृत्ती


ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तकाचे मुख्य धडे


1️⃣ सवयी आयुष्य घडवतात

आपलं यश किंवा अपयश अचानक होत नाही.

ते दररोजच्या छोट्या निर्णयांचं आणि सवयींचं परिणाम असतं.

वाईट सवयी हळूहळू आयुष्य बिघडवतात,

आणि चांगल्या सवयी शांतपणे आयुष्य घडवतात.

2️⃣ सवय तयार करण्याचे ४ सुवर्णनियम

🔹 1. सवय स्पष्ट करा (Make it Obvious)

चांगल्या सवयी डोळ्यासमोर ठेवा.

उदा. पुस्तक टेबलावर ठेवा, मोबाईल लपवा.

🔹 2. सवय आकर्षक बनवा (Make it Attractive)

ज्या सवयी आनंद देतात, त्या टिकतात.

व्यायामाला संगीत जोडा, अभ्यासाला आवडता चहा ☕.

🔹 3. सवय सोपी ठेवा (Make it Easy)

मोठी सुरुवात करू नका.

५ मिनिटं पुरेशी आहेत. सातत्य महत्त्वाचं आहे.

🔹 4. सवय समाधानकारक ठेवा (Make it Satisfying)

लहान यश साजरं करा.

ते मेंदूला सवय टिकवायला मदत करतं.

ध्येय नव्हे, ओळख बदला (Identity Based Habits)

हे पुस्तक सांगतं की खरी बदलाची सुरुवात ध्येयांपासून नाही, ओळखीपासून होते.

❌ “मला लेखक व्हायचं आहे”

✅ “मी रोज लिहिणारी व्यक्ती आहे”

❌ “मला वजन कमी करायचं आहे”

✅ “मी आरोग्याची काळजी घेणारा माणूस आहे”

आपण स्वतःला जे समजतो,

तेच आपण हळूहळू बनतो.

ॲटॉमिक हॅबिट्स का वाचावं?

✔️ आत्मविकासासाठी

✔️ शिस्तबद्ध जीवनासाठी

✔️ विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, नोकरदारांसाठी

✔️ मोटिवेशनपेक्षा सिस्टीमवर विश्वास ठेवायला शिकण्यासाठी

हे पुस्तक सांगतं—

👉 यशासाठी जबरदस्त मोटिवेशन नाही, योग्य सवयी हव्यात.

Atomic Habits Marathi Summary – निष्कर्ष

ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक फक्त वाचायचं नाही,

ते जगायचं आहे.

आज एकच छोटा बदल करा.

उद्या त्याचं फळ नक्की मिळेल.

🌱 लहान सवयी + सातत्य = मोठं यश 🌱

गुरुवार, मार्च १८, २०२१

कणा - कवी कुसुमाग्रज (kana poem by Kusumagraj)

कणा - कुसुमाग्रज(kana poem by Kusumagraj)

कणा
 

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!
                      भयंकर संकटातही आपला कणा म्हणजेच स्वाभिमान ताठ  कसा ठेवता येईल ; याची शिकवण देणारी ही कविता आहे.  कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या दिव्य  लेखणीतून तयार   झालेले    हे काव्यशिल्प अजरामर आहे. ज्या ज्या वेळी कुठेतरी निराशेची छाया जीवनाला ग्रासण्याचा प्रयत्न करते; त्या त्या वेळी ही कविता आपल्याला ताठपणे उभे राहून जीवनाचे गाणे हे आनंदाने गायचे असते; दुःखाने कुढत बसायचे नसते हेच सांगत आहे.
                        ही कविता मला बीएला होती. आमच्या मराठीच्या शेख सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने या कवितेचे रसग्रहण सादर केले होते. कुसुमाग्रजांच्या इतरही आणि कविता होत्या त्या सर्वच अतिशय सुंदर आहेत. जीवनाला दृष्टी देणारे आहेत. मनाला पुष्ट करणारे आहेत.
                        परंतु दरवर्षी जेव्हा जेव्हा 27 फेब्रुवारी ही तारीख येते आणि "मराठी भाषा गौरव दिन "साजरा होणार असतो ;  तेव्हा ही कविता माझ्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही आणि या कवितेचे रसग्रहण करणारे आमचे सर सुद्धा आठवल्याशिवाय राहत नाहीत. सरांनी कुसुमाग्रजांच्या या कविता अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला शिकवल्या. त्यामधील काव्यरस आम्हाला चाखायला शिकवला. त्यांचे आम्हा विद्यार्थ्यांवर खूप ऋण आहेत. त्यांच्यामुळे आम्हांला कुसुमाग्रज समजू लागले; उमजू लागले आणि जीवनाची दृष्टी या "कणा " सारख्या कवितेतून कशी भेटते हे आम्हाला समजले.              
                                                                         धन्यवाद !!!
      

मंगळवार, फेब्रुवारी २३, २०२१

मराठी भाषा गौरव दिन

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला दरवर्षी 2013 सालापासून मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रभर आणि जिथे जिथे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत तिथे तिथे साजरा केला जातो.

मराठी भाषा एक साहित्याची समृद्ध परंपरा असलेली अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षांचा आहे या अडीच हजार वर्षांमध्ये मराठी भाषेमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. गाथासप्तशती कवी मुकुंदराज यांचा काव्यसिंधू संत ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका अर्थातच महाराष्ट्राचा भाषिक ठेवा ज्ञानेश्वरी पासून आजच्या सर्वसामान्य मराठी भाषिका पर्यंत अभिमानाने मिरवत आहे.

 कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. कुसुमाग्रज हे जन्मजात प्रतिभावंत कवी होते याची साक्ष म्हणून काय जवळजवळ सोळा काव्यसंग्रह भरतील इतका काव्य  त्यांनी लिहिले आहे. विशाखा जीवनलहरी समिधा छंदोमयी अशाप्रकारे त्यांनी खूप सुंदर काव्यसंग्रह मराठी भाषेला दिले अतिशय सुंदर आणि भारदस्त विषय घेऊन त्यांनी मराठी भाषेत नाटके लिहिली नटसम्राट वीज म्हणाली धरतीला दुसरा पेशवा ही नाटके फारच प्रसिद्ध आहे.

अशा या कुसुमाग्रजांना त्यांच्या मेघदूत या कालिदास कृत संस्कृत  नाटकाच्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला 1988 यावर्षी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन कुसुमाग्रजांना गौरविले.

कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषे ची सेवा करून साजरी केली पाहिजे असे मला वाटते जरी इंग्रजी भाषा हाच प्राबल्य वाढवीत असली तरी ती आपली मातृभाषा नाही ती परकी भाषा आहे फक्त कामा पुरती ठेवली पाहिजे आणि तिच्याकडून पाहिजे ते काम करून घेतले पाहिजे बस बाकी काही नाही. बाकी फक्त .....

जय मराठी 

जय महाराष्ट्र



मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१

राष्ट्रीय पक्षी:- मोर

 राष्ट्रीय पक्षी:- मोर


मोर हा भारताचा "राष्ट्रीय पक्षी'' आहे.

' नाच रे मोरा आंब्याच्या वनात 

राष्नाच रे मोरा नाच '

हे गाणे सर्वांनाच आवडते. त्याच प्रमाणे मोर 

सुद्धा सर्वांना आवडतो. मोराचा रुबाबच वेगळा असतो. त्याचे सौंदर्य अतिशय बोलके असते. 

मोर भारतात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र 

आढळतात. मोराच्या दोन जाती आढळतात. 


जंगली अर्ध जंगली मोर आणि जंगली मोर. 

गावापासून लांब जंगलात डोंगराच्या जवळ 

वसाहती करून राहतात. तर अर्ध जंगली 

मोर माणसांच्या वसाहतीजवळ आढळतात. 

मोर नराला रंगीबेरंगी पिसारा असतो. 


मोराचा रंग मोहक निळा असतो. मोरासारखे 

सौंदर्य मोराच्या मादीला नसते. मादीला लांडोर म्हणतात. मोर आकाशात पावसाळी ढग आले 

की आनंदाने नाचतो.मोर नाचायला लागला; 

की लांडोर पण नाचते. 


           मोराचा सुंदर पिसारा पूर्ण उभारून

 केलेला नाच पाहण्यासारखा असतो. रात्रीच्या 

वेळी मोर उंच झाडावर एकत्र वस्ती करतात. 

मोर हा सर्व पक्षी आहे. दाणे, पिकांचे

 कोवळे कोंब, कळ्या, धान्य, बिया, गांडूळ ,

सरडे, विंचू व  साप हे त्याचे अन्न असते. 


त्याचप्रमाणे टोमॅटो केळी मिरची यासारखे 

अन्नावर ताव मारून मोर शेतीचे नुकसानही

 करतात. लांडोर एकावेळी 5 - 6 अंडी घालते. 

अंड्यांचा रंग फिकट पिवळा असतो.

व आकार गोल असतो. अंडी उबवायला

 एक महिना लागतो. मोराच्या ओरडण्याला 

केकावणे म्हणतात.  विशिष्ट पद्धतीने आवाज 

काढून तो थव्यातील इतर मोरांना धोक्याची 

सूचना देतो. 

                    मोरपिसाचे पंख करतात. 

लहान मुले आपल्या पुस्तकात आवडीने 

मोरपीस ठेवतात.

बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१

मराठी शब्द - परिचालक

          अलीकडे मराठी भाषेत अधिक नवीन शब्द दाखल होत आहेत. धिम्या  पावलाने का होईना मराठी भाषा समृद्ध होत आहे. असे वाटते.  आपण मराठी भाषा मागे पडत चालली आहे अशी ओरड करतो. मात्र मराठी भाषिकांसाठी काही चांगल्या बातम्याही आहेत.

नुकताच मी दैनिक सकाळ पेपर मध्ये एक नवीन शब्द वाचला; तो म्हणजे "परिचालक". 

 आता तुम्ही म्हणाल परिचालक म्हणजे काय? आपले म्हणणे बरोबर आहे प्रश्नही बरोबर आहे. कारण मराठी भाषा किती समृद्ध आहे याची जाणीव फक्त मराठी पुस्तके वाचणारे वाचक जाणून आहेत.असो.

      परिचालक या शब्दाचा अर्थ  इंग्रजी भाषेत ऑपरेटर असा होतो.

          25 जानेवारी रोजी घोडेगाव येथे संगणक परीचालकांनी एक  निषेध मोर्चा काढला होता. निमित्त होते संगणक परिचालक यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा आणि किमान वेतन मिळावे ही .

    महाराष्ट्र मध्ये सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावर हे आंदोलन झाले . आज आपण एकविसाव्या शतकाच्या एकविसाव्या वर्षात असताना , संगणकाचे युग प्रचंड मोठी व्याप्ती असलेले तंत्रज्ञान घेऊन आले आहे. मात्र हे संगणक हाताळणारे परिचालक अजूनही कर्मचारी म्हणून घेण्यास पात्र ठरू नयेत; हे विशेष वाटते . 

         आपण नेहमी भारत एक  महासत्ता  होणार आहे अशी चर्चा करतो, मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यातल्यात्यात संगणक परिचालक यांना कर्मचार्‍याचा दर्जा आणि किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आहे .

Featured Post

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

                   आज आपण   एकविसाव्या शतकात  इंग्रजी  भाषेचे  प्रचंड प्रमाणात  अनुसरण  करीत आहोत. हे आपल्या  मराठी  भाषाभिमानी  माणसाला  अ...