वारी

  वारी
    वारी चालली  पंढरी
     विठ्ठल  विठ्ठल  गजर,
   वारकरी  चाले  पायी
      माझं कोरडं वावर .
 टाळ  आणि  टाळ्या
    मुखी भजन  विठूचे ,
घरी  पोरं आणि  गुरं
  माझं  कोरडं  वावर.
एक डोळा आभाळी ,
  एक डोळा अश्रू   ढाळे ,
ऋण कसे  फेडणार
 माझं कोरडं वावर.
 दुष्काळ  दयेचा  पडला
 मळा  मायेचा  आटला,
चंद्रभागे वाळवंट
 माझं कोरड वावर
ज्ञानेश्वर  तुकाराम
  तुम्ही  वैकुंठाला  गेला  ,
आम्ही  पंढरीला  जातो
 मागे  कोरडं वावर.
आषाढ  आला पाऊस  गेला
 विठ्ठलाला  साकडे
भजन   गात रोकडे
 मागे  कोरड वावर
नाही  धान्य  नाही  पैसा
  विठ्ठला  हा काळ कसा  ,
सावकारे गाठलो आता
 मागे  कोरडं वावर.
रोज  जाती जीव
 येत नाही  का रे कीव ,
विठ्ठला  कैसा  दगड  तू झाला
 पाड पाऊस  ,माझं कोरडं वावर.
     .....श्री. तुकाराम गायकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

कणा - कवी कुसुमाग्रज (kana poem by Kusumagraj)