मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१

राष्ट्रीय पक्षी:- मोर

 राष्ट्रीय पक्षी:- मोर


मोर हा भारताचा "राष्ट्रीय पक्षी'' आहे.

' नाच रे मोरा आंब्याच्या वनात 

राष्नाच रे मोरा नाच '

हे गाणे सर्वांनाच आवडते. त्याच प्रमाणे मोर 

सुद्धा सर्वांना आवडतो. मोराचा रुबाबच वेगळा असतो. त्याचे सौंदर्य अतिशय बोलके असते. 

मोर भारतात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र 

आढळतात. मोराच्या दोन जाती आढळतात. 


जंगली अर्ध जंगली मोर आणि जंगली मोर. 

गावापासून लांब जंगलात डोंगराच्या जवळ 

वसाहती करून राहतात. तर अर्ध जंगली 

मोर माणसांच्या वसाहतीजवळ आढळतात. 

मोर नराला रंगीबेरंगी पिसारा असतो. 


मोराचा रंग मोहक निळा असतो. मोरासारखे 

सौंदर्य मोराच्या मादीला नसते. मादीला लांडोर म्हणतात. मोर आकाशात पावसाळी ढग आले 

की आनंदाने नाचतो.मोर नाचायला लागला; 

की लांडोर पण नाचते. 


           मोराचा सुंदर पिसारा पूर्ण उभारून

 केलेला नाच पाहण्यासारखा असतो. रात्रीच्या 

वेळी मोर उंच झाडावर एकत्र वस्ती करतात. 

मोर हा सर्व पक्षी आहे. दाणे, पिकांचे

 कोवळे कोंब, कळ्या, धान्य, बिया, गांडूळ ,

सरडे, विंचू व  साप हे त्याचे अन्न असते. 


त्याचप्रमाणे टोमॅटो केळी मिरची यासारखे 

अन्नावर ताव मारून मोर शेतीचे नुकसानही

 करतात. लांडोर एकावेळी 5 - 6 अंडी घालते. 

अंड्यांचा रंग फिकट पिवळा असतो.

व आकार गोल असतो. अंडी उबवायला

 एक महिना लागतो. मोराच्या ओरडण्याला 

केकावणे म्हणतात.  विशिष्ट पद्धतीने आवाज 

काढून तो थव्यातील इतर मोरांना धोक्याची 

सूचना देतो. 

                    मोरपिसाचे पंख करतात. 

लहान मुले आपल्या पुस्तकात आवडीने 

मोरपीस ठेवतात.

बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१

मराठी शब्द - परिचालक

          अलीकडे मराठी भाषेत अधिक नवीन शब्द दाखल होत आहेत. धिम्या  पावलाने का होईना मराठी भाषा समृद्ध होत आहे. असे वाटते.  आपण मराठी भाषा मागे पडत चालली आहे अशी ओरड करतो. मात्र मराठी भाषिकांसाठी काही चांगल्या बातम्याही आहेत.

नुकताच मी दैनिक सकाळ पेपर मध्ये एक नवीन शब्द वाचला; तो म्हणजे "परिचालक". 

 आता तुम्ही म्हणाल परिचालक म्हणजे काय? आपले म्हणणे बरोबर आहे प्रश्नही बरोबर आहे. कारण मराठी भाषा किती समृद्ध आहे याची जाणीव फक्त मराठी पुस्तके वाचणारे वाचक जाणून आहेत.असो.

      परिचालक या शब्दाचा अर्थ  इंग्रजी भाषेत ऑपरेटर असा होतो.

          25 जानेवारी रोजी घोडेगाव येथे संगणक परीचालकांनी एक  निषेध मोर्चा काढला होता. निमित्त होते संगणक परिचालक यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा आणि किमान वेतन मिळावे ही .

    महाराष्ट्र मध्ये सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावर हे आंदोलन झाले . आज आपण एकविसाव्या शतकाच्या एकविसाव्या वर्षात असताना , संगणकाचे युग प्रचंड मोठी व्याप्ती असलेले तंत्रज्ञान घेऊन आले आहे. मात्र हे संगणक हाताळणारे परिचालक अजूनही कर्मचारी म्हणून घेण्यास पात्र ठरू नयेत; हे विशेष वाटते . 

         आपण नेहमी भारत एक  महासत्ता  होणार आहे अशी चर्चा करतो, मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यातल्यात्यात संगणक परिचालक यांना कर्मचार्‍याचा दर्जा आणि किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आहे .

सोमवार, जून २९, २०२०

ब्रह्म कमळ /Bethelham Lily/Epiphyllum oxypetalum

ब्रह्म कमळाचे  शास्त्रीय   नाव : Epiphyllum oxypetalum असे आहे. शाखीय  पद्धतीने  ही  वनस्पती  रोपण करतात.भारत देशात ही वनस्पती पूजनीय आणि श्रद्धेचा विषय आहे.

हा  निवडुंगाचाच (cactus)एक  प्रकार आहे. 
असे  असले तरी या वनस्पतीला  काटे  नसतात. 
पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असतात. 
वर्षातून एकदाच पांढरी सुगंधी फुले या वनस्पतीला येतात. 
फुले येतात त्या दिवशी  संध्याकाळी अंधार पडला की हळूहळू उमलायला  सुरूवात होते. 
जून महिन्यापासून  सप्टेंबर पर्यंत  केव्हाही  कळ्या  येतात. 
आणि  फुले उमलतात.


 विशेष म्हणजे एकाच  दिवशी अनेक ठिकाणी ब्रह्म कमळ उमललेले आढळते. हेही एक प्रकारचे आश्चर्य वाटते. 
फुलांचा पांढरा रंग खूप सुंदर आणि मोहक असतो.शिवाय  मंद  सुगंध भुंगे आणि इतर  किटकांना आकर्षक वाटतो.

 
    ही वनस्पती तिच्या ब्रह्म कमळ   नावामुळे  भारतीय वाटते. परंतु  ती मुळात  अमेरिका खंडातील आहे. 
ब्रह्मकमळ - या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कमळाला ‘बेथेलहॅम लिली’ (Bethelham Lily) असे म्हणतात.
   ब्रह्म कमळ  फुलल्यावर त्याची पूजा केली जाते. 
एकाच झाडाला  फुललेली  ब्रह्म कमळे पाहणं हा एक पर्वणीचा काल वाटतो. 
  फुले  तोडण्यापेक्षा  झाडावर  अधिक खुलून दिसतात.


     मुख्य माहिती स्रोत :- विकिपीडिया .


शनिवार, जून २७, २०२०

वेडा राघू / Green Bee Eater

                                   वेडा राघू हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत याचे वास्तव्य आहे.हिमालयात ५००० किंवा ६००० फूट उंचीवरसुद्धा आढळले आहेत. त्याच्या विशिष्ट  नावामुळे तो लगेच नावात वेडा शब्द असल्याने आपल्याला  वाटेल असे कसे नाव आहे. हा पक्षी त्याच्या वर्तनावरून वेडा नाही तर बुद्धिमान वाटतो. भक्ष्य पकडताना वेडीवाकडी वळणे घेतो. सुरही मारतो. अचूकपणे भक्ष्याचा वेध घेतो. त्याच्या भक्ष्य पकडतांनाच्या वेड्यावाकड्या वळणांमुळे वेडा राघू हे नाव पडले असावे: असे वाटते. भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो. परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला ‘वेडा राघू’ असे नाव पडले आहे.असेही म्हटले जाते.
                 नावापूर्वी वेडा अशी उपाधी भेटलेला हा एकमात्र प्राणी असावा. त्याचे वेडा राघू हे गुणवैशिष्ट्यपूर्ण आहे.राघू या नावामुळे तो पोपट वाटेल: परंतू पोपटसारखा असणारा साधारणतः चिमणीच्या आकाराएवढा हा पक्षी आहे
इंग्लिश नाव : Little Green Bee-eater) शास्त्रीय नाव :Merops orientalis

                 विजेच्या तारांवर हा आपल्याला दिसतो. तो जोडीनेच राहतो. एक दिसला की समजावे दूसरा कुठतरी असलाच पाहिजे. वेडा राघू या पक्ष्याला बहिरा पोपट असेही म्हणतात. शेपटी निमुळती लांब असते. हवेत उडणारे कीटक, मधमाश्या  पकडून खातो. याचा रंग हिरवा असला तरी पोपटाइतका  हिरवा नसतो.
                डोके आणि मानेवर सोनेरी व तपकिरी (brown) रंगाचे मिश्रण असते. चोचीच्या खाली निळसर छटा दिसते.चोच बाकदार व शरीराच्या मानाने लांब असते. तशीच शेपटीसुद्धा .
               फेब्रुवारी ते मे हा विणीचा काळ असतो.जमिनीच्या बांधामध्ये किंवा वाळूच्या कडेला एखाद्या बोगद्यासारखे वेडा राघूचे घरटे असते.त्यामध्ये मादी पांढरी चमकदार अंडी घालते. उबवणीचे काम नर मादी दोघेही करतात. आणि पुढे पिल्लांच्या संगोपणाचे कामसुद्धा मिळून करतात.
                  *** मुख्य माहिती स्रोत :- विकिपीडिया .
                            

बुधवार, मार्च १५, २०१७

महत्त्वाचे शासन निर्णय

शासननिर्णय स्पेशल

गुरुवार, मे २६, २०१६

इंग्रजी माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा

इंग्रजी  माध्यम आणि  जिल्हा  परिषद  शाळा 
एक वस्तुस्थिती
1)जिल्हा परिषद  शाळा  विद्यार्थ्यांना  काय  देतात? मोफत  शिक्षण,         (सर्वांना )                                 मोफत  पाठ्यपुस्तके, (सर्वांना )                                मोफत  दोन गणवेश,       (सर्वांना )                                     मोफत  सायकली,    (मुलींना )                               आदिवासी  मुलांना  व सुवर्ण महोत्सवी  शिष्यवृत्ती , मोफत  स्काॅलरशिप परीक्षा, (सर्वांसाठी )
मोफत  प्रज्ञा  शोध  परीक्षा, (सर्वांसाठी)
इयत्ता  पहिली  पासून इंग्रजी  विषयाचे अध्यापन ,
वाचन, लेखन,  संभाषणसाठी We Learn English हा Radio  Program,
सर्व  महापुरुषांच्या  जयंती  आणि  पुण्यतिथी  साजरी करण्यात येत  असून  त्याद्वारे  राष्ट्र प्रेम  निर्माण  केले  जाते.
दरवर्षी  प्रजासत्ताकदिनी  गॅदरींग  सारख्या  भव्य   सांस्कृतिक  कार्यक्रमाचे सादरीकरण केले  जाते.
प्रत्येक  घरी  शौचालय  असावे म्हणून धडपडत  असते  जिल्हा परिषद  शाळा  !!!
प्रत्येकास कुटुंब  नियोजन  कळावे  म्हणून  धडपडत  आली  आजपर्यंत  जिल्हा परिषद शाळा  !!!
गाव,  परिसर  स्वच्छ  राहावा ,  आरोग्यदायी  रहावा म्हणून  आजपर्यंत  धडपडत असणारी  शाळा  जिल्हा  परिषदचीच !!!
म्हणून  म्हणतो  मातृभाषा  हेच  मानसशास्रीय  आणि  नैसर्गिक  माध्यम आहे  .
आपल्या  कोवळ्या  मुलामुलींना इंग्रजी  माध्यमाच्या कोंडवाड्यात  टाकून  त्यांच्या नैसर्गिक  वाढ आणि  विकासाची  दुर्दशा  करू नका  !!!
आज  जिल्हा परिषद  शाळेत  संगणक  लॅब  , E.
Learning  ,टॅबलेट   आहेत .
शाळांचे  वातावरणात   चित्रमय  आहे,  बोलके आहे,
प्रशिक्षित  आणि  गुणवंत  शिक्षकवर्ग आहे.
आणि  इंग्लिश  मिडियमच्या मुलांना  जे  येते
त्यापेक्षा जास्तच ह्या  मुलांना  येते.  आणि  हे सगळे  करण्यासाठी पैशांच्या थैल्या  या  शाळेत  खाली  करून  घेतल्या   जात  नाहीत  .......
इंग्रजीत संभाषण,  वाचन, लेखन  यात  ही  मुले  कुठेच  कमी  पडत  नाहीत  हे  आम्ही  छाती  ठोकून  सांगतो. ......
आणि  शेवटी  इंग्लिश  मिडियमला जाऊनही
कचरा  किंवा  गाळ  होणारी  तुमची  लेकरं  आमच्याच  वळचणीला  येणार  . काय  ?
इंग्रजीतून सांगतो Be Alert  , don't be  fool all over in your life?


शुक्रवार, जुलै १७, २०१५

वारी

  वारी
    वारी चालली  पंढरी
     विठ्ठल  विठ्ठल  गजर,
   वारकरी  चाले  पायी
      माझं कोरडं वावर .
 टाळ  आणि  टाळ्या
    मुखी भजन  विठूचे ,
घरी  पोरं आणि  गुरं
  माझं  कोरडं  वावर.
एक डोळा आभाळी ,
  एक डोळा अश्रू   ढाळे ,
ऋण कसे  फेडणार
 माझं कोरडं वावर.
 दुष्काळ  दयेचा  पडला
 मळा  मायेचा  आटला,
चंद्रभागे वाळवंट
 माझं कोरड वावर
ज्ञानेश्वर  तुकाराम
  तुम्ही  वैकुंठाला  गेला  ,
आम्ही  पंढरीला  जातो
 मागे  कोरडं वावर.
आषाढ  आला पाऊस  गेला
 विठ्ठलाला  साकडे
भजन   गात रोकडे
 मागे  कोरड वावर
नाही  धान्य  नाही  पैसा
  विठ्ठला  हा काळ कसा  ,
सावकारे गाठलो आता
 मागे  कोरडं वावर.
रोज  जाती जीव
 येत नाही  का रे कीव ,
विठ्ठला  कैसा  दगड  तू झाला
 पाड पाऊस  ,माझं कोरडं वावर.
     .....श्री. तुकाराम गायकर 

Featured Post

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

                   आज आपण   एकविसाव्या शतकात  इंग्रजी  भाषेचे  प्रचंड प्रमाणात  अनुसरण  करीत आहोत. हे आपल्या  मराठी  भाषाभिमानी  माणसाला  अ...