मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा
आज आपण एकविसाव्या शतकात इंग्रजी भाषेचे प्रचंड प्रमाणात अनुसरण करीत आहोत. हे आपल्या मराठी भाषाभिमानी माणसाला अजिबात भूषणावह नाही. पण इंग्रजी भाषाच एकमेव ज्ञानभाषा आहे, असा गैरसमज मराठी भाषेचा शत्रू बनत आहे. थोडक्यात काय तर आपण एका भयंकर गैरसमज आणि अफवेने मराठी भाषेला कमी लेखत आहोत. कारण मराठी ही शतकानुशतके एक ज्ञान भाषा म्हणून भारतात नांदत होती आणि आता सुद्धा नांदत आहे. आज वाईट वाटते ते याच गोष्टी बद्दल की मराठी भाषकच मराठी भाषेवर आक्रमण करीत आहे. त्यांना ...