मराठी भाषा गौरव दिन
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला दरवर्षी 2013 सालापासून मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रभर आणि जिथे जिथे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत तिथे तिथे साजरा केला जातो. मराठी भाषा एक साहित्याची समृद्ध परंपरा असलेली अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षांचा आहे या अडीच हजार वर्षांमध्ये मराठी भाषेमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. गाथासप्तशती कवी मुकुंदराज यांचा काव्यसिंधू संत ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका अर्थातच महाराष्ट्राचा भाषिक ठेवा ज्ञानेश्वरी पासून आजच्या सर्वसामान्य मराठी भाषिका पर्यंत अभिमानाने मिरवत आहे. कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. कुसुमाग्रज हे जन्मजात प्रतिभावंत कवी होते याची साक्ष म्हणून काय जवळजवळ सोळा काव्यसंग्रह भरतील इतका काव्य त्यांनी लिहिले आहे. विशाखा जीवनलहरी समिधा छंदोमयी अशाप्रकारे त्यांनी खूप सुंदर काव्यसंग्रह मराठी भाषेला दिले अतिशय सुंदर आणि भारदस्त विषय घेऊन त्यांनी मराठी भाषेत नाटके लिहिली नटसम्राट वीज म्हणाली धरतीला दुसरा पेशवा ही नाटके फारच प्रसिद्ध आहे. अशा या कुसुमाग्रजांना त...