ब्रह्म कमळ /Bethelham Lily/Epiphyllum oxypetalum

ब्रह्म कमळाचे शास्त्रीय नाव : Epiphyllum oxypetalum असे आहे. शाखीय पद्धतीने ही वनस्पती रोपण करतात.भारत देशात ही वनस्पती पूजनीय आणि श्रद्धेचा विषय आहे. हा निवडुंगाचाच (cactus)एक प्रकार आहे. असे असले तरी या वनस्पतीला काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असतात. वर्षातून एकदाच पांढरी सुगंधी फुले या वनस्पतीला येतात. फुले येतात त्या दिवशी संध्याकाळी अंधार पडला की हळूहळू उमलायला सुरूवात होते. जून महिन्यापासून सप्टेंबर पर्यंत केव्हाही कळ्या येतात. आणि फुले उमलतात. विशेष म्हणजे एकाच दिवशी अनेक ठिकाणी ब्रह्म कमळ उमललेले आढळते. हेही एक प्रकारचे आश्चर्य वाटते. फुलांचा पांढरा रंग खूप सुंदर आणि मोहक असतो.शिवाय मंद सुगंध भुंगे आणि इतर किटकांना आकर्षक वाटतो. ही वनस्पती तिच्या ब्रह्म कमळ नावामुळे भारतीय वाटते. परंतु ती मुळात अमेरिका खंडातील आहे....